STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Romance

3  

PANKAJKUMAR THOMBARE

Romance

धुंद साथ

धुंद साथ

1 min
283

पुरे फार झाले सखी प्रेम दावे

तनाने मनाशी कितीदा लढावे


अशी रात आहे सुगंधी कळ्यांची

कळ्यांनी खुशीने खुलावे फुलावे


नभी चांद आहे सखे सोबतीला

तरी चांदणीने असे का रुसावे


नभी तारकांनी दिले गं इशारे

किती वेळ माझ्या उशाला बसावे


अशा धुंद रात्री युगांनी न येई

असे आज मी का मिठीला मुकावे  


असा वेळ साकी नको व्यर्थ घालू

मिठी घट्ट मारून तू एक व्हावे


अशी रात धुंदीत प्रीतीत घालू

पहाटे प्रिये प्रेमरंगी उरावे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance