STORYMIRROR

Pratibha Vibhute

Romance

3  

Pratibha Vibhute

Romance

धुंद झाले मन

धुंद झाले मन

1 min
155

प्राजक्ताला आला बहार

अंगणात पडला सडा

धुंद झाले हे मन वेडे

उत्साहाचा भरला घडा...१!


अलवार हिंदोळ्यावर

मन बेधुंद माझे झुलते

खट्याळ पवन स्पर्शाने

गाली कोमल कळी खुलते...२!


पानोपानी फुलले फुले

परिसर झाला सुगंधित

दवबिंदू ओघळून मोती

पाहून मन झाले आनंदीत...३!


कोमल फुलपाखरं,भ्रमर

फुलाभोवती करी गुंजारव

शोषून फुलातील मकरंद

पाहून धुंद मन होई आरव...४!


बाळ रूपी घरात खेळतो

दुडूदुडू धावत कृष्ण कान्हा

धुंद झाले हे मन पाहतांना

आठवला माझा बाळ तान्हा...५!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance