STORYMIRROR

Rani More

Romance

2  

Rani More

Romance

चांदण्यांची रात

चांदण्यांची रात

1 min
14.2K


नशीबाच्या हस्तरेषा गोदंण्याची रात होती

श्वासात गुंफलेल्या चांदण्याची बात होती

 

भ्रमराच्या अधुऱ्या रातराणीची रात होती

ओठात भिजलेल्या मधुगंधाची बात होती

 

ती विज मौनातली गरजण्याची रात होती

देहावरी जलप्रित बरसण्याची बात होती

 

धूंद नजरेतल्या काजव्यांची रात होती

पापणित  जागलेल्या आसवांची मात होती

 

काळजाची विण गुफंण्याची रात होती

मेहेंदीत सजलेल्या अलगुजाची बात होती

 

हळदी ने कुंकवात रंगण्याची रात होती

सौभाग्यात कौमार्य विरघळण्याची बात होती


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance