तू यावंस
तू यावंस
तू यावंस चिंब पावसात,
त्या ओल्याशार दिवसात..
भन्नाट वाऱ्याच्या लयित...
बरसणाऱ्या चिंब सरीत...
तू यावंस चिंब पावसात..
घायाळ नजर कटाक्षात...
स्वप्नांच्या रेशीम धाग्यात...
इंद्रधनुष्याच्या सप्तरंगात...
तू यावंस चिंब पावसात...
झोबंऱ्या प्रीत गारव्यात...
अतूट विश्वासाच्या मारव्यात...
उबदार मिठीच्या शिरव्यात..
तू यावंस चिंब पावसात
एकदा तुझ्या सोबत
मला भिजाचयं....
तुझ्या उबदार मिठीत
मला हरवून जायचंय..
खरंच येशील ना तू....
त्या ओल्या चिंब पावसात....
मन ओथंबून जाईल हर्षात..
तुझ्या हळव्या कातर स्पर्शात...
खरंच येशील ना तू
त्या ओल्याचिंब दिवसात...
बरसणाऱ्या चिंब सरीत...
भन्नाट वाऱ्याच्या लयीत
खरंच येशील ना तू...

