STORYMIRROR

Rani More

Romance

2  

Rani More

Romance

चिंब संध्याकाळ

चिंब संध्याकाळ

1 min
14.1K


एक ओली चिंब खिडकितली    संध्याकाळ.

 पाऊस बरसून गेलेली.

सारी मरगळ  विरघळून गेलेली.

कॉफीच्या मगच्या तळात.

मावळतीला रात्र उरून राहीलेली

भरून आलेल्या नभाच्या दुलईत लपेटून.

बैचेन करणाऱ्या पिवळसर संधिप्रकाशातून सांडलेले क्षितिज.

थेंब थेंब पावसाची संथ धुन टिप  टिप.

पानापानातून  ओघळणारी.

आणि तृप्त धरणीच्या समाधानाचे उसासे मातीच्या गंधातुन.

वाऱ्यावर लहरणाऱ्या जगजीतच्या गजलेत चिंब भिजून गेलेले मन पावसाळी

भरात आलेली माझी कविता व्याकरणाचे सगळे नियम तोडून.

तेव्हा आपण भेटू मी तू पणाची सारी बंधने मोडून.

 

     


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance