STORYMIRROR

Kishor Zote

Classics

3  

Kishor Zote

Classics

शिदोरी ( सहाक्षरी )

शिदोरी ( सहाक्षरी )

1 min
338

ते अनुभवाचे

बोल मार्गदावी

पावले पुढेच

सन्मार्गी चालावी


खरे खोटे पणा

आपला ओळखा

सत्यपणा सदा

कृतीत दाखवा


उन्हात नव्हे ते

झालेले पांढरे

पावसाळे आहे

पाहीले बहु रे


नसावा चुकून

घ्यावा कमी पणा

उद्धार आपला

करणे हो जाणा


वाट ती नवीच

सदा चोखाळावी

अनुभवाची ही

शिदोरी खोलावी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics