राहुनी गेले सांगायचे...
राहुनी गेले सांगायचे...
आज कोवळ्या उन्हाची सल नजरेत खलते
तुझ्याविना तहानलेला श्वासास जगणे छळते
बहर अंगणी माझ्या गगनात नभ कोरडे वाटते
तुझ्यासवे सुखावलेला क्षणास मन हे तडफडते
कण कण जिंदगी आता गित सुखाचे गाते
क्षण फितुर जाहले नजर मनास का खुणावते
सुखाच्या वेलीवर मेघाची सर दू:खाची बरसते
तुझ्याविना जगणे खोटे राहुनी गेले तुज सांगायचे
शब्द मुका जाहला गर्दीत हरवता प्राण जिवांचा
मिटल्या पापणीत ठेवला गुतूंनी जीव ते पाखरांचे
आज सावलीतल्या छबीस झळ शिशिराची बसते
पखाराच्या कंठात अडकलेली तहान प्रश्न विचारते
बरसला देह तो मेघांचा कुठे झिरपली ती सर पहाटे
तुझ्याविना जगणे कधीही मज वाटे बहाणे फुकाचे
भेटता नजर नजरेस नव्याने सावालीस त्या भेटते
उमजुनी मनास सारे राहिले सांगायचे बोल अंतरीचे

