कोंदण
कोंदण
भूलला का आसमंत
चंद्र मनी का झुरतो
किनार त्या क्षितिजा
कोंदणात का सजतो
जग विसावले भासते
क्षण थांबले हे जरा
बहर जगण्यातला ही
बंदीस्त आयुष्यभरा
सिमित ते नक्षीदार
भय अंतरी जगते
विश्वस्त होण्या आधी
मन धुक्यास भुलते
भाळते ती पौर्णिमा
चंद्र विरहास झुरते
जग अंधुकशी आस
दुरव्यात का शोधते
नको छळ भावनेचा
मनी क्षमा विसावते
जगणे केवळ निमिष
जणू कोंदणच जगते
क्षण सुखाचे सलता
प्रश्न मनी का विरहतो
काय बोचते या मनात
काटेरी जिवन भासते
सल ती दु:खाची रेशमी
किनार सुखाची सोनेरी
भय भरले आसमंती
नयनी काजळ भरली
कोंदण ही का मिरवते
गोंदण सजली भाळी
कैद होतात का वादळे
पापणीच्या या अंतराळी

