आभास
आभास
मी पणातून जपलेलं
नाजूक फूल तू
कधी मनाच्या अंताला
गेलास
समजलेच नाही
मनानं धरलेल्या वाटेत
कधी श्रावण क्षणांचा
सडा पडला स
उमजलेच नाही
ती पापण्यांची चलबिचल
अशी हवेतली माझ्यात
पाहून गेलास
का स्वतःतच रमलास
कळालेच नाही
उद्याचा भास तो
आज ही खुणावतो
तो माझ्यात शोधेल
का त्याला
या प्रश्नावर मन उभारतो
तू ही असे या क्षणी
हे ही नसे थोडके
मनीचे ओझे आणि
मनीचे ते कवडसे

