सांज संध्या...
सांज संध्या...
सांज वारा
सांज संध्या
खुनावी ती
पुन्हा पुन्हा
मळभ दाटे
आभाळ झाकोळून
परतुनी ये
पुनः पुन्हा
तूच आधी
तूच व्याधी
तूच भासे
ती मृगजळा
केशरी ती
पसरली लाली
धुंद वाटे
तो बहाणा
साद सुटली
अबोल्याची
शांतता वसे
ती अंतरी
हा होईल का
माझा गुन्हा
तप्त त्या विस्मृतीच्या
गंधीत अशा भावना
सांज वारा
साद घाली
फिरुनी ये
पुन्हा पुन्हा...

