व्यथा....
व्यथा....
वळणा वळणाच्या घाटात
भासणारी ती गर्द वाट
आज अवचित काळोखली गेली
माणसा माणसानं भरलेले
नागमोडी रस्ते
आज सुने झाले
वांद्याचा तो गजर थांबला
घ्यायचे राहिले ते बाप्पाचे नाम
चैत्र तरी पहाट फुलवून जाईल नवी
हा विचारच घोघावत राहिला नुसता मनात
माणूसपण पोरक वाटतं
जेंव्हा बाप मुलाला खांदा देतो
आई पण कसं बुजत जेंव्हा
मुलगाच आई ला विसरतो
वैशाखात असतं रखं रखत उन
पण 21 चा वैशाख पावसाची उडी घेऊन आला
माणसाच्या थडग्याना गंगा तिराहून
स्वतः त सामावून घेऊ लागला
वाळूतले ते देह
भासले जरी निष्प्राण
तरी मायेची ममता
त्यांना पैलतीरी खुणावत असेल
जणू माणसाला ही
स्वतःच्या दुखापुढे
जबाबदारीच बोल लावत असेल
