शब्द....
शब्द....
बोलायचे तुझ्याशी शब्दांनीच
मनात पुसायचे ही शब्दांनीच
ती कळकळ जीवाची
उमगायची शब्दांनीच
भास वर्णायचे तुझे शब्दांनीच
खोलवर रुतलेले आर्जव
मांडायचे तुझ्यासमोर शब्दांनीच
शब्दच बोलतात तुझा आचार
शब्दच मांडतात दिवसाचा
तुझा माझ्यातला सहचार
काट्या सारखे वर्णी लागतात
तुझेच मधु गंध शब्द
घायाळ ही करतात
तुझेच ते नेत्रकुंभ
लोण्या सारखे वितळतात
माझ्यातले तुझे शब्द
प्रेमाची साद ही
घालतात तेच ते
आठवणीतले शब्द
शब्दांचा च सारा खेळ
शब्दांची च सगळी भेळ
शब्दांनीच तुझ्या माझी
कविता लिहशिल काय
माझ्या आयुष्याचं गमक
तू शब्द बनून मांडशील काय😘

