STORYMIRROR

अमृत -वेल

Romance Inspirational

3  

अमृत -वेल

Romance Inspirational

तू.....

तू.....

1 min
203

श्वास तू ध्यास तू

मनीचे गूज अन

अंतरीची आस तू

नभातील चंद्र तू

श्रावणातील मोर तू

माझ्या चित्तचकोराचा

मधुर पावा तर कधी

नाजूक नात्याची वीण तू

प्रितीच्या शब्दाचा

मधुगंध तू

ताल मी अन् सुर तू

लय मी तर नाद तू

गर्जनाऱ्या लाटेचा

स्वर मी अन्

मनात उमलली

आर्त तू

श्वास तू  

ध्यास तू

 मनीचे गुज अन्

 अंतरीची आस तू ,  

मनातल्या भावनांची गोडी तू 

 भासल्या क्षणांची सावली तू 

 निरागस असलेला हास्य तू

 जोडलेल्या नात्यांची गुंफण तू 

 श्यामच्या मुरलीचा सूर तू 

 राधेच्या प्रेमाचा हूर तू 

 रिमझिम पावसाची सर तू अन्

डोलणाऱ्या मनाची उभारी तू  

कोकिळेच्या कुजणाचा गोडवा तू 

 आनंद फुलवणारा पाडवा तू  

मैत्रीच्या धाग्याचं बंधन जसं

 कधीही न भरणारा 

 मनातील श्रावण तू.......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance