STORYMIRROR

अमृत -वेल

Drama Romance

3  

अमृत -वेल

Drama Romance

मनातलं चांदणं....

मनातलं चांदणं....

1 min
232

मनातलं चांदणं 

आशेच्या नभी उतरलं ,

भावनांचा मेघ

 उरी दाटून आला ,

सांगू लागला विरणाऱ्या 

मेघांचे भास ,

जशी अवतरावी 

सप्तरंगी नाती त्या क्षितिजात ,

सुखाचा लेणं घेऊन येइल

ती वाऱ्याची झुळूक ,

परतवून लावेल त्या

बरसणाऱ्या दुःखाच्या  सरीला ,

उगवेल तो दिवस 

जेंव्हा होईल नवी पहाट  ,

चौफेर होईल उधळण 

भरलेल्या आसमंतात ,

चंद्राची सावलीही लाजेल 

पाहून ती...

कोमल गुलाबी पहाट


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama