** सावली **
** सावली **
शोधतो माझ्यातल्या मी प्रतिमेला
माझीच परछाया आहे माझ्या सोबतीला
माझ्यात मी स्वतःला हरवून जातो
समोर तू दिसतेस तेव्हा मी हरखून जातो
तुझी-माझी प्रतिमा बनलीस तू
तुझ्याच मार्गाची दिशा ठरवतोय मी
समोर असतेस जेव्हा तू
मिसळून जातो तुझ्यात मी
तुझ माझ्या पायाखाली येणं
आणि दिवसाची मध्यान्ह होणं
अंधारातील काळोखाचं येणं
आणि तुझं गायब होणं
आशेवरच माझं उगाचच जगणं
कि कोणीतरी आयुष्यभर साथीला असणं
हृदयातील भावनेला जाग करणं
आणि माझ्या अंत यात्रेला तुझं नसणं
प्रकाश आहे तुझा आणि माझा सोबती
अंधार मात्र बनला का आपला वैरी
पावलोपावली दूरवर तू माझ्याबरोबर चालती
विरह सहन कसा करू जेव्हा तू नसशील माझ्या बरोबरी
