बालमन....
बालमन....
सवंगडी खेळतात
लपाछपी, हूतूतूतू
मला बसविलं इथं
म्हणें चार आणे देतूं...
लईं ताप झाला भावा
माय म्हणें बस इथं,
बाप गेला हूंदडाया
डोळा लागें अवचित...
मायच गुणी लेकरुं
तिचं समद ऐकतो
मागं पुढ राहूंशान
जमल तसं करतों...
राब राब राबतें ती
सोय करतें पोटाची
मह्यासाठी ऊनवारा
नाहीं परवा कशाचीं...
काय काय सांगितले
न राहीं काही लक्षात
भाव किती तो कशाचा
घोळ झाला समद्यात...
पाव किलो अर्धा किलो
वजन मापे ठेवली
कद्दू आणि काकडीचा
फरक नाही दावलीं...
कठीण संसारगाडा
कसा बसा तो हाकतों
करूं नै लगीनघाई
तुम्हां म्हणून सांगतो...
