कसे जगावे नारीने
कसे जगावे नारीने
कसे जगावे नारी तू
माय व्हावे तू जिजाऊ.
अन् राणी लक्ष्मीबाई
गाथा शौर्याची हो गाऊ.
गनिमांना सैतानांना
पाजावेस तुम्ही पाणी.
प्राण द्यावे लढतांना.
व्हावे लक्ष्मीबाई राणी.
नारी आदर्श सावित्री
ज्ञानेशाची हो मुक्ताई.
अनांथांचा तू आधार
व्हावे अनाथांची आई.
संकटात हो खंबीर
झाली माय सिंधुताई.
कसे जगावे नारीने
दिला आदर्श तू माई.
लेक लाडकी होऊन
झाली इंदिरा जगात.
राष्ट्रपती हो प्रतिभा
नाव होऊ दे विश्वात.
असे जगावे तू नारी
देवी भवानी मर्दानी
मार तू महिषासूर
माय तू रणरागिणी.
