चेहरा
चेहरा
सागर किनारी संध्याकाळी
पाहते मावळणाऱ्या सूर्याकडे
किती रुबाबदार दिसतो पहा
मुखवटा सूर्य बिंदी कपालाकडे.
केशरी रंगाची जल तरंगे
शांत प्रवाह करती लाटा
निरव शांतता मनास भासते
छान काढते मी वाळुतून वाटा.
क्षितिजावर नभांगणी रंगित गुलाल
चष्मातुनी पाहताना दिसे छान
सांज ही नटली खास मधुचंद्रास
सागररुपी प्रियकराची ती शान.
सज्ज जाहला सागर आता
भेटण्या सांज वेळेस किनारी
रुबाब त्याचा दिसे भारदस्त
काळा चष्मातुनी मस्त ती स्वारी.
