होळी
होळी
हिरण्यकशिपूच्या द्वेषाने जाळले मुलाच्या भक्तीला,
पण भक्त प्रल्हादाच्या भक्तीने केले अचंबित सर्वांना ।
होलिकेसमवेत पोटच्या मुलाचे देखील केले दहन,
परंतु प्रल्हादाच्या भक्तिने सर्वच केले सहन ।
यांच्या कथेनी झाली सुरुवात होळी सणाची,
होळीच्या पवित्र अग्नित दुःख-चिंता जाळण्याची ।
पुरणपोळीच्या स्वादाने सर्वत्र गोड़वा पसरवला,
अन् रंगाच्या उधळ्याने प्रेमाचा ऋतु वसवला ।
कुणी म्हटलं शिमगा तर कुणी दिलं होळीचं नाव,
एकोप्याने सण साजरा करून घेऊ संस्कृती जपण्याकड़े धाव ।
वाईटावर चांगल्याचा विजय हेच या दिवसाचे महत्त्व,
प्रेम आणि आपुलकीने साजरा करून जपूया भारतीय संस्कृतीचे तत्व ।
यंदाच्या होळीत तुमचे सारे दुःख जळावे,
यश आणि आनंदाच्या रंगानी तुमचे आयुष्य मळावे ।
।। होळीच्या खूप खूप शुभेच्छा ।।
