नारी, तू कस्तुरी !
नारी, तू कस्तुरी !
वाटले तुला थांबले आकाश
ते क्षितिज होते वेडे,
मार्ग बहु असती नारी
तू चाल पुढे....1
स्वत्व सिद्ध करण्यासाठी
किती काळ थांबतेस?
आत डोकाव ना जरा
किती वेळ लावतेस?...2
मोहपाश मायेचा
मृगजळ आहे कळतंय ना?
मुखवट्याच्या आतला
चेहरा वेगळा, समजतंय ना..3
राखेतल्या फिनिक्स पक्ष्यासम
चिवट स्त्री जात असे.
सजग रहा नि प्रामाणिक!
यशशिखर दूर नसे...4
उगीचच होऊ नको सैरभैर
तूच आहेस कस्तुरी!
गरुडासम हो पुनर्जिवीत !
घे नारी, तू उंच भरारी....5
