सौदामिनी ज्ञानाची....
सौदामिनी ज्ञानाची....
1 min
318
मुक्ती देण्या स्त्रीला,
कलियुगे सरस्वती
अवतरली!
मुजरा माझा
घे तुला सावित्री
माऊली...1
घुसमटलेल्या मनात
जिचे बंदिस्त कर्तृत्त्व,
चुलीच्या धुरातच
काळवंडे अस्तित्त्व....2
पतीहीन होता
केशवपणा,
थरथरे ती जननी
नाभिकांना शपथ देऊनी
कडाडली सौदामिनी...3
अनाथ बाळे पाहून
जिचे मातृत्त्व तळमळे,
दत्तक पुत्र घेऊनी
रूढीवर प्रहार केले...4
पती आज्ञा मानून वसा
कर्मात साथ दिली
गौरव त्यागाचा पतीसह
सन्माना पोचली....5
अंतिम क्षणीही टिटवे घेऊन
पतीचे निघाली,
धाडस हे तिचे
पाहता वसुंधरा थरथरली...6
महामारीत जनसेवा
करता धारातीर्थी
पडली,
क्रांतिज्योती ठरे ती
ज्योतिबाची सावली...7
स्वयंभू आज नारी
तिचा आत्मसन्मान
वाढला,
युगंधरा तू सफल
ठरे आजमितीला...8
