STORYMIRROR

Prabha Wagh

Others

4  

Prabha Wagh

Others

मर्यादापुरुषोत्तम

मर्यादापुरुषोत्तम

1 min
246

कौसल्येच्या ममत्वासाठी साक्षात विष्णू प्रगटला.

सूर्यवंशी दशरथाघरी राम जन्मला.


वसिष्ठ -शिष्य एकबाणी मारीच,सुबाहूचा वध केला.

शिवधनुष्य पेलूनी स्वयंवराचे रघुनंदन जानकीचा झाला.


परमदयाळू पुत्र जाणी अगतिक पित्याच्या शब्दाला.

सिंहासन त्यागुनी सत्यवचनी वनवासास निघाला.


मैथिली सह पंचवटीत असता कांचन मृग मोह तिज झाला.

ओलांडली लक्ष्मणरेषा रावणाचा कावा न कळला.


हनुमान, सुग्रीव, वानरसेना, बिभीषण  ही सहाय्यास आला.

विजयपताका घेऊनी श्रीराम अयोध्येस परत आला.


शबरीची ज्याने चाखली बोरे, अहिल्येचा उद्धार केला.

पण राष्ट्रनिष्ठेसाठी रघुपतीने वैदेहीचा त्याग केला.


एकपत्नी राहुनी राजवैभव नाही भोगले.

दुःख भोगूनी स्वतः रामराज्य निर्मियले....


Rate this content
Log in