STORYMIRROR

Prabha Wagh

Children

3  

Prabha Wagh

Children

पतंग उडवू चला

पतंग उडवू चला

1 min
293

चला मुलांनो टेकडीवर

नाहीतर या सारे माळावर


उडवू चला पतंग सारे

आभाळी तरंगती जशी पाखरे


लाल पिवळा निळा जांभळा

नभी रंगांचा जणू सोहळा


कणी पतंगाची अचूक बांधा

मांजा ठिक पकडा,नाही तर वांधा


झेपावती मग उंच पतंग

हर्षाचे उठती मनी तरंग


साऱ्या हालचाली करा जपूनी

नको दुर्घटना आनंदाच्या क्षणी


किती मिळतो प्राणवायू पहा!

सूर्यप्रकाश असा घ्यायला हवा


फेका मोबाईलचे आभासी खेळ

आरोग्य नि खेळांचा घाला मेळ


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children