वसंत उत्सव न पहाणारा अभागी
वसंत उत्सव न पहाणारा अभागी
अभागी म्हणती कशास
कशास सोडावे हे जगणे
जगणे असे हे तो पावेतो
पावेतो आस्वाद चाखणे.
चाखणे कर्मची मिलींद
मिलींद जरासे होवूया,
होवूया झाकळला नभ
नभ चराचरात फिरूया.
फिरूया गंधाळला मरूत
मरूत वसंताचा बनूया,
बनूया शिवार जागोजागी
जागोजागी वसंत भोगुया.
भोगुया घेत सारा आस्वाद
आस्वादच शेवट सवे येई,
येई काही ना कामी जीवन
जीवन रित्या हातीच जाई.
जाई भगवंता मी जवळी
जवळी उल्हासित मोदाने,
मोदाने कंठिले हे बहुमूल्य
बहुमूल्य सांगेन न खेदाने.
