निसर्ग
निसर्ग
कुणी न उठवता भास्कर उठतो,
त्या पाठी निसर्ग सोयरा जागतो.
त्याच्या कुशीतच दडलाय व्याप,
पण संगतीने मिटतो साराच ताप.
मेघाराणी गरवार सहावे न भार,
वसुंधरेत जल रूपाने उडे तुशार.
वृक्षराज वाढती घेत खग पसारा,
श्यामा गाऊन सांगे गोड नजारा.
किलबिल,वायूलहर,ते शुद्ध जल,
तया देत नाही मी कोणतेच मोल.
न लागे इंधन,भोजन,रक्षण,बल,
तरी प्राणवायू देत, ठेवी समतोल.
पायी मृदुतृण,फुलवास पसरी,
मधू,फळे देत,फुलखरू भ्रामरी.
तटीनी,सागर,डोंगरदरी,भूवरी,
मनसोक्त जगे मी असे जोवरी.
शालू हरित,इंद्रधनु पदर,सप्तसुर,
ओटी तुझ्या,बालगोपाळ,नारीनर.
गर्द छायेत रमती,गाई गुरे जनावर,
अवनी ओझे होई तू सावरून धर.
साऱ्या जगताची लागे तुज तमा,
भरविते तरी राव रंक अन् आम्हा.
घेते आन आज नी सांगते त्यानां,
न घातपात,लावू तरू फेडू ऋणांना.
