STORYMIRROR

vanmala patil

Abstract

3  

vanmala patil

Abstract

माझा बा

माझा बा

1 min
294

बात पतेकी याचा अर्थ बापच म्हणायचा

चुकले तरी पाठीवर थाप बापच मारायचा. 


बाप बाहेर उन्हात सदा घाम गाळायचा

म्हणूनच मुलगा त्याचा चार बुक वाचायचा.


पांढरी शुभ्र टोपी घालून झानझान चालायचा 

पायाखाली जमीनीत छाती ठोकून असायचा.


माय अन् बायकोत सदाच पिठ बनायचा 

समतोल सारा राखून हिमालय गाठायचा.


हृदयाच्या पटलामागे अदृष्य रहायचा 

आभायात शुक्र निघे तवाच धरती जागवायचा.


पिकलेल्या पानांच्या सभेत कधी न जायचा 

हारे का रे करत घर गाडीही ओढायचा.


सह्याद्रीच्या नाकासारचा थेट नीट चालायचा 

कसा जगतो, जगतोय हे चाचपूनही पहायचा.


शेवटी बाप माझा खंद्या आजाराने घेरायचा.

बघता बघता बाप माझा धरतीला हलकं करायचा.


पाठीचा कणा गेल्यावर आता बाप काय लिहायचा

उगाच शब्दांनी सजवून फोटो ओला करायचा.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract