कुसुमाग्रज नटसम्राट
कुसुमाग्रज नटसम्राट
मूळ असे नांव माझे
गजानन रंगनाथ
शिरवाडकर जन्म
झाला जिल्हा नाशकात
छोटा असताना काका
घेती वामन दत्तक
वि.वा शिरवाडकर
बने जीवन हस्तक..
आम्ही हो सहा भावंडे
छोटी कुसुम बहीण
होती लाडाची आमुची
पडे कुसुमाग्रज ठेवण..
जन्म २७ मार्च १९१२
अग्रगण्य साहित्यीक
४० दशक लिखाण
बहू कविता नाटक...
जीवन लहरी,किनारा,
मराठी माती विशाखा
स्वगत काव्यसंग्रह न
वादळ वेल,हिमरेखा..
दुसरा पेशवा,कौंतेय,
वैजयंती,नटसम्राट
ययाती नी देवयानी
नाटके ते राजमुकूट...
कल्पनेच्या तीरावर,
वैष्णव,जानव्ही कादंबरी
बोथकथा लिहील्या मी
फुलवाली,बोल सतारी..चे..
१९७४ सालात माझ्या
नटसम्राट नाटकाला
मिळे साहित्य अकादमी
वाचकांत हो बोलबाला..
१९६४ सालात गोव्याला
मी बनलो संमेलनाध्यक्ष
कर्म करता लेखणीचे
देवाने पाहीले वक्र अक्ष..
१० मार्च १९९९ सनात
माझी मालवली ज्योत
शारदेच्या मंदिरातले
मी दैदिप्यमान रत्नात..
