शब्द
शब्द
भान नसे रसनेस
रसनेस चव न्यारी
शब्द पाघळला सये
सये दुष्टते अंतरी.
दिसे सरोजात भारी
भारी नभाचा बावरा
दैत्य बनलो न मित्था
मित्था देतसे उभारा.
फिरे ममतेचा शिरी
शिरी आशीर्वाद देत
कधी बनतोय दैत्य
दैत्य चरणासी नेत
शब्द बांधीतसे घर
घर घर लागे याने
नेल आभाळास भर्र
भर्र पाताळात जाने
गीत भूपाळीचा शब्द
शब्द वर्षेत नाचरा
नव वधूलाच करी
करी कावरा बावरा
घुसे जसा घाव तुटे
तुटे उद्धार आधारा
घेता खग जैसा उडे
उडे होवून मोहरा
