आई
आई
काय सांगू मी आज कोणा
ऐक देवा तूच माझे गराणे
मातेच्या त्या आठवणीत ढाळले
रोज अश्रू माझ्या पापणीने
बाबा नाही आई दुरावली
डगमगले घर माझे गैरसमजाने
आई वीणा सांग देवा
जगायचे कसे या लेकराने
मानलेले नाते आज सारे
गुंफलेले एकाच लाल रक्ताने
पोटच्या ला आपलंस मग
पाप काय केले इथं मानल्या ल्याने
स्त्री रुपी दिसली एक माता
पूजले तीस मनी प्राजळ भावनेने
सर्व काही तुझ्याच इच्छेने देवा इथे
घायाळ केले मज आज या वेदनेने
ह्रदयातले आपलंसे स्थान माझे
परक्या गत झाले आज कश्याने
मागतो मी परत जागा ह्रदयी
एक लेकरू पोटचेमी या हक्काने
चूक भूल होते सर्वाकडून इथं
माफ होते ती आईच्या न्यायालयाने
पाहिलं मी वाट माते आयुष्यभर
तुझी माझ्या या हळव्या मनाने
