सहल
सहल
चला करू या गम्मत जम्मत
आपण मिळूनी सारी
हो आपण मिळूनी सारी
संपली परीक्षा, अभ्यास नाही रे
ही सुटका झाली प्यारी
ही सुटका झाली प्यारी
चला करू या गम्मत जम्मत
आपण मिळूनी सारी
हे पक्षी गाती गान कोठले?
त्या आकाशाचे रान भेटले
कसे उडाले?
गगनातून हे घेता एक भरारी
चला करू या गम्मत जम्मत
आपण मिळूनी सारी
आता ना ओझे पाठी वरती
सखे सवंगडी सारे जमती
चला दोस्तहो सहलीतून या
मजा लुटू या न्यारी
मजा लुटू या न्यारी
चला करू या गम्मत जम्मत
आपण मिळूनी सारी
ते उडते फूल पाखरू
मज सांगे गोष्टी करू
कशी रंगली? सांज आकाशी
कोण असे रंगारी
कोण असे रंगारी
चला करू या गम्मत जम्मत
आपण मिळूनी सारी
