बालपण
बालपण
बालपणीचा काळ सुखाचा
मित्रांसोबत बागडण्याचा
लपाछपीचा, सुरपाटीचा
परंब्यावर झुलायचा
फौज जमे मित्रांची
आंब्याच्या पारावरती
आम्ही सगळे उडायचो
पंख पसरून वाऱ्यावरती
बावऱ्या य मनाला
मित्रांची संगत भावायची
आईच्या हातच्या भाकरीला
प्रेमाची चव असायची
गेले ते बालपण
आठवणींचे ओझे राहिले
जगाच्या या भाऊगर्दीत
मित्र सारे हरवले
