माझा महाराष्ट्र
माझा महाराष्ट्र
हिंदू राष्ट्राचे जनक
झाले शिवाजी महान |
केला उभा महाराष्ट्र
याची वाढवून शान ||१||
संत तुकोबा ज्ञानोबा
एकनाथ नामदेवा |
संत राज्यात जन्मले
ज्ञानी मुल्यवान ठेवा ||२||
महालक्ष्मी, मुंबादेवी
यांचा तुला वरदान |
सिध्दी विनायक आणि
साईंबाबा भगवान ||३||
लेणी एलोरा अजंता
एलीफंटा अभिमान |
जैन, हिंदु आणि बौद्ध
तिन्ही धर्माचे हे स्थान ||४||
फुले टिळक जन्मले
इथे आगरकर लाल |
त्यांनी स्वातंत्र्यकरिता
फार सोसले हो हाल ||५||
भिमा कृष्णा गोदावरी
वैनगंगा नदी धारा |
आणि वनसमृध्दीने
राज्य नटलेला सारा ||६||
माझा महाराष्ट्र आहे
सर्व राज्यात महान |
चला गाऊया हर्षाने
त्याचे आम्ही गुणगान ||७||
