बालमजूर
बालमजूर
घरात अठराविश्व दारिद्र्य ,
वाढती महागाई
गरिबी अनेक सामाजिक समस्यांना जन्म देते
त्यापैकी एक ही बालमजुरी
मुखी जाण्यास दोन घास दिवस-रात्र गाळतात घाम
कधी हॉटेल कधी टपरीवर करतात हे काम
कुदळ, फावडे कोवळ्या हाती उपसतात माती
डांबरी रस्त्यावर हातोडा हातात घेऊन फोडतात खडी
कुठली पुस्तके लेखणी अन् पाटी
आयुष्यात फक्त राबणे ललाटी लिहिलेले वजनापेक्षा जास्त ओझे घेऊन
फिरतात बालमजूर हे अनवाणी
लहानपणीच अंगावर त्यांच्या पडतं
जबाबदारीचं ओझं
लहानपणीच केलं जातं त्यांना मोठं
सावलीत असलेलं बालपण हरवलं जात
खेळण्या-बागडण्याच्या या वयात
वेदनांचं काहुर दाटलेल असत कोवळ्या मनात
तरीही काम करावं लागतं तप्त उन्हात
शिव्या घाली मालक तरीही निमूटपणे ऐकावं लागतं
भविष्याची उज्ज्वल स्वप्न मनामध्ये सजवत असताना
परिस्थितीला निमूटपणे सामोर जावं लागत
अंमलात आणली योजना तरी बालमजूर
या संख्येचा वाढतोय दर
शिकण्याचे वय त्यांचे फक्त फायदा पाहातो मालक
गंभीर गुन्हा हा, यास तशी अद्यापही
डोळेझाक आहे...
परंतु
बालकांना सुदृढ बनवणे, प्राथमिक शिक्षण
उपलब्ध करून देणे
समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारीआहे
देशाचे भवितव्य आहे यावर अवलंबून
देशाचा भावी आधारस्तंभ बालके
शक्य असल्यास मिळून द्यावे यांना हक्क
राष्ट्राची अमूल्य संपत्ती ही
हे कसं चालेल विसरून .....?
