पर्यावरण
पर्यावरण
मानवा तू आतातरी
थांबव रे हा नाश
हळूहळू सुटू लागले
आप्तजनांचे पाश
झाडांची तू कत्तल केली
उघडे पडले डोंगर
सिमेंटच्या जंगलासाठी
तूच फिरवलास नांगर
कोरड्या पडल्या विहिरी
आता आतून गेले आड
दूरदूर रस्त्याकडेला
कुठेच दिसेना झाड
विज्ञानाची कास धरून
कारखाने तू उभे केले
सांडपाणी तू नदीत सोडून
गंगामाईला प्रदूषित केले
ज्या वसुंधरेने पालन केले
तिच्यावरच तू वार केले
याचीच परतफेड म्हणून
कोरोनाचे संकट आले
