बळीराजा
बळीराजा
लागे मृगाची चाहूल
नभी येती काळे ढग |
शेतीकाम करण्याची
सुरु होई लगबग ||१||
ऊन कडक तापते
तरी जातो शेतावर |
भर ऊन्हात राबतो
सर्वांसाठी हलधर ||२||
वखरणी, नांगरणी
करुनिया मशागत |
बैल गाडीने टाकतो
शेतामध्ये शेणखत ||३||
करी मृगाच्या दिवशी
बीज टाकून मुहूर्त |
बळीराजा मेहनत
करी देवाच्या सुपूर्त ||४||
मृग नक्षत्र सरीने
बीज रुजते मातीत |
खुश होतो बळीराजा
पीक पाहून शेतीत ||५||
