प्रेम बंधनाच्या गाठी
प्रेम बंधनाच्या गाठी
बालपण आठवले
दारी पाऊस पाहून |
स्वप्न पाहत बसलो
बालपणी त्या जाऊन ||१||
ढग गर्जुनी नभात
सर आली पावसाची |
खेळण्यास पाण्यामध्ये
नाव केली कागदाची ||२||
नावे मध्ये बसविले
एक राजाराणी जोड़ी |
हाती दिली लाल छत्री
नाव चाले आड़ीमोड़ी ||३||
दिले होते सोबतीला
रम्य गवताचे फुल |
निळ्याशार पावसात
होतो खेळण्यात गुल ||४||
राजाराणी जोड़ी वाटे
होती आमचीच कृती |
पहावया गोड स्वप्ने
सोबतीला ही प्रकृती ||५||
रस्ता दाखवी तू मला
नाव पुढे जाण्यासाठी |
देई साथ जोडूनिया
प्रेम बंधनाच्या गाठी ||६||

