शाळेचा पहिला दिवस
शाळेचा पहिला दिवस
1 min
389
आज शाळेचा पहिला दिवस
साफ सफाई केली खूप
केर कचरा कुठेच नाही
शाळेला आलं बाई छान रूप...(१)
सर्व मैत्रिणी वर्गात गेलो
बेंचवर बसण्याची घाई
दोन दोन जोड्या केल्या
माझा काही पाय पुरेना बाई...(२)
मधली सुट्टी झाली आता
डबा खाण्याची झाली घाई
गप्पा करीत जेवत बसलो
आवाज् देऊन थकल्या बाई...(३)
पहिल्या दिवशी अभ्यास नाही
गप्पा गोष्टी खेळण्यात दंग
शाळा आमची खूप छान
सर्व राहता एकमेका संग... (४)
