STORYMIRROR

Priti Dabade

Others Children

3  

Priti Dabade

Others Children

फटफजिती

फटफजिती

1 min
254

कडक उन्हातून आले पाहुणे

चहाची वेळही टळली होती

म्हणून म्हटले करावे सरबत गोड

लिंबाची फोड नेमकी सापडत नव्हती


गुळ पाणी देऊन केले त्यांना स्थानापन्न

गप्पागोष्टीत कसातरी घालवला तास

चार वाजले एकदाचे घड्याळात

दरवळला मग सर्वत्र चहाचा वास


फटफजितीने सुरू झाली कुजबूज

एव्हाना हा प्रकार लक्षात आला पाहुण्यांच्या

बिस्किटे अन् चहाचा आस्वाद घेत 

हसून हसून पोटात दुखले साऱ्यांच्या


नट्टापट्टा करून दारातून बाहेर पडणार

तितक्यात वाजली दाराची बेल

संतापाने दार उघडताच 

दिसली पाहुण्यांची रेलचेल


असे पाहुणे येती

अन् कार्यक्रम रद्द होऊनी जाती

सुरू होई परत चहाची तयारी

पाहुण्यांच्या आदरतिथ्याला सारेच लागती


Rate this content
Log in