ओढ तुजी
ओढ तुजी
1 min
233
लागलीसे ओढ येई बा पावसा
उरे ना कोण कोणाला भरवसा.
वाट पाहे नदी,ओढा ही थकला
नाला सुकला रे कोरडा पडला.
कुपनली शाळेत ठणठण झाली
पाणी कशे पितील चिल्लीपिल्ली.
ओढ लागली भेटण्यास भ्रताराला
दे रे आता खळखळ त्या सरिताला.
बीज गेले भूईत नाही त्यास धिर
कसा येईल रे ढग नी कसा तो डिर.
बाप चातक करी वर वरती डोळे
फक्त थेंबासाठी धरती रे तरमळे.
आस लागली रे ओढ ना संपली
शेतातली पिक रे कशी दीन सानुली.
ओढ झाडे,पान,फुलात जनाला
कोणाचा आता तुच सांग मनाला.
जाता जाता सांगते मी रे तुला
साऱ्याच्या देहात झुलव रे झुला.
माय तहानली माझी थेंबाच्या आढीने
लागे तुझी ओढ होईल संसार गोडीने.
