तलाक... तलाक... तलाक...
तलाक... तलाक... तलाक...
1 min
6.7K
त्याने, तलाक, तलाक, तलाक म्हणत
ठेचली....
तिची जाणीव,,,अस्मिता,,,अस्तित्व अन मर्यादाही
या अल्लाह,,,
मग एकदा तिने तलाक म्हणण्याचं केलं,
जानलेवा धाडस
तिची जीभ छाटली,
गोळी छातीत घातली,
छेदला सारा देह ,
हाय अल्लाह,,,
आता तिच्या आत्म्यानं
कायद्याशी निकाह केला
सुभान अल्लाह,,,
तलाक, तलाक, तलाक
खुदा हाफीज,,,,