लायब्ररीच्या कपाटातली पुस्तकं..
लायब्ररीच्या कपाटातली पुस्तकं..
लायब्ररीच्या कपाटातली पुस्तकं..
आता एकटी-एकटी झाली आहेत..
मोबाईलच्या जमान्यात..
हल्ली कुणीच तिथे फिरकत नाही..
आधी तशा.. कितीतरी कहाण्या वाचण्यासाठी..
खूप गर्दी असायची तिथे..
पुस्तकंही वाचणाऱ्याच्या..
अंगा खांद्यावरून खेळायचीत कधी..
पण आता तिथे कुणीच फिरकत नाही..
ईबुक्स डाउनलोड करतात सर्वे..
आता एका touch वर..
मोबाईल मध्ये पुस्तकं साठवत राहतात..
पण पानं पलटाताना जो स्पर्श व्हायचा पुस्तकांचा..
तो मोबाईलच्या स्क्रीन ला सरकवताना..
आता होत नाही..
पानांमधून जो सुगंध दरवळायचा..
आणि हळूच हृदयात जाऊन बसायचा..
मोबाईल मधल्या इलेक्टोनिक पानांमधून..
कसलाच सुगंध येतं नाही..
पुस्तकं वाचताना..
जे हरवून जायचो आपण..
एका वेगळ्याच दुनियेत..
एका वेगळ्याच विश्वात..
ते ई-बुक वाचताना..
पुन्हा पुन्हा..
येणारे नोटिफिकेशनस..
कधी हरवून देतंच नाहीत..
म्हणून.. लायब्ररीच्या कपाटातली पुस्तकं..
आता एकटी-एकटी झाली आहेत..
पुस्तकं तशी खूप बोलणारी.. बडबडणारी..
पण आता शांत-शांत असतात..
कदाचित त्यांचे शब्द..
मितभाषी झाले आहेत..
पुस्तकांच्या पानामधून सुटणारा सुगंध..
गुसमटतोय कपाटाच्या आतच..
निपचित पडलेला असतो..
पूर्वी स्पर्शानी सजलेले पुस्तकाचे कव्हर..
आता धुळीने माखलेले असतेे..
खरी वाटणारी.. पुस्तकांमधली काल्पनिक पात्र..
आता पूर्णपणे काल्पनिक झाली आहेत..
पुस्तकामधून पडणारा पाऊस..
आता पुरा सुकलेला असतो..
एखाद्या माणसाच्या मनातला ओलावा..
त्याला मिळतंच नाही..
हल्ली.. अर्थ हीे.. चुकल्या-चुकल्या सारखे वागतात..
शब्दांच.. अर्थांसोबत आता जमत नाही..
म्हणून.. लायब्ररीच्या कपाटातली पुस्तकं..
आता एकटी-एकटी झाली आहेत..
.
.
पण.. ऐकलंय असं..
पुस्तकं रोज सकाळी..
आशेच्या किरणासह.. लवकर उठतात..
अक्षराना हलवून जागं करतात..
गरम शब्दांनी अंघोळ करतात..
अर्थामध्ये आपला चेहरा बघतात.. आवरतात..
लागलेल्या धुळीला जरा बाजूला सारतात..
.
.
आणि
कोणी सोडून दिलेल्या.. अर्धवट कहाण्या..
नव्याने पूर्ण करण्यासाठी..
लायब्ररीच्या दाराकडे आस लावून..
रोज कुणाची तरी, वाट बघत राहतात..