STORYMIRROR

Kaustubh Wadate

Others

3  

Kaustubh Wadate

Others

बलात्कार..

बलात्कार..

1 min
12.1K

असं म्हणतात.. देव कणा - कणांत वसताे..

असं म्हणतात.. देव जगातले सर्व काही जाणतो..

असं म्हणतात.. देव सर्वांच्या मदतीसाठी धावून येताे..

असं म्हणतात.. देव मनापासून मागितलेले सर्व देतो..

असं म्हणतात.. देव सर्वांच्या मनातले सर्व ओळखतो..

असं म्हणतात.. देव संकटात असलेल्यांना वाचवतो..

असं म्हणतात.. देव सर्वांची दुःखे दूर करतो..

असं म्हणतात.. देव सर्वांवर लेकरांसारखे प्रेम करताे..

असं म्हणतात.. देव सर्वांना समान आशीर्वाद देतो..

असं म्हणतात.. देव सर्व जीवांचे संरक्षण करताे..


पण हाेत असताे जेव्हा बलात्कार एखाद्या मुलीवर..

किंचाळणाऱ्या हाकांतून ती बाेलावते मदतीला..

तरीही कुठलाच देव.. वाचवायला..

कधीच येत नाही..

कधीच येत नाही..


Rate this content
Log in