क्रांतिकारक भगतसिंग
क्रांतिकारक भगतसिंग
माता विद्यावती सिंग
पिता सरदार किशनसिंग
पोटी जन्मले पुत्र महान
क्रांतिकारी सेनानी भगतसिंग
देशावरच्या प्रेमाखातर
परिवार होता क्रांतिकारक
धडाडीच्या भगतसिंगांची
ब्रिटिशांवर नजर बारीक
विचारांनी होते श्रेष्ठ
उभे केले क्रांती शस्त्र
जालियनवाल्याचे ऐकून कृत्य
उचलले स्वातंत्र्य लढ्याचे शस्त्र
भर सभेत फेकला बाॅम्ब
भोगला कारावास मित्रांसंग
देशभक्तीचे उसळे तरूण रक्त
अंगात भिनलेले स्वातंत्र्य तरंग
इन्क्लाबचे करीत नारे
झाडली गोळी अधिकाऱ्यावरी
इंग्रजांसमोर लावली हजेरी
हसत हसत गेले फासावरी
