आठवण पहिल्या भेटीची
आठवण पहिल्या भेटीची
प्रेम प्रथम जुळले असे
अवचित दोघे समोर
नजरेला भिडली नजर
कळले जेंव्हा दोघे हसल्यावर
भाव तुझे दिसले मला
गालावरच्या खळीत
गंध सुगंधित झाला
उमलत्या पाकळीत
भास होई अलगद
चाहूल लागे हळूवार
पोर्णिमेच्या चांदव्याला
प्रितीचा चंदेरी मोहर
भेट तुझी माझी सख्या
जसा वळवाचा पाऊस
ओल्या मातीचा सुवास
सुखद क्षणांचा सहवास
हात हाती वचनात
ओल्या चिंब पावसात
खट्याळ वारा डिवचीत
ओले रूप सुखवित
