STORYMIRROR

Sunita Padwal

Classics

3  

Sunita Padwal

Classics

मामाच्या गावा जाऊ

मामाच्या गावा जाऊ

1 min
201

जाऊ मामाच्या गावा

गाव मामाचा मोठा

हिरवी दाट झाडी झुडूपा

नागमोडी सुंदर पाऊलवाटा ||१||


हुर्रे उन्हाळी सुट्टीची मौजमजा

स्वछंदी पक्षासम बागडत

झाडावर बसू आंबा, पेरु खाऊ

खळखळ वाहे पाट हिरव्या शेतात ||२||


मामाचे मंगलोरी कौलारू घर

धूरकांडी नळी दिसते घरावर

घराच्या चहूभोवत कुंपण

बांबू माणग्याचेच मुख्यद्वार ||३||


मामा मामी लाडीक वाळ

आजी आजोबा मायाजाळ

भरभरून झिरपे प्रेमसागर

मिळे आम्हा सर्वकाळ ||४||


अन्नपूर्णा मामीचे जेवण रुचकर 

मामा आणितो रानमेवा भरपूर

ताव मारु पुरणपोळी शिखरणावर

आजोळी आठवणींचा उरभर महापूर ||५||


गावच्या पायथ्यालगत लागून

सरोवर तलाव नदी पाण्याचा

सवंगड्यासंग गाणे गात पोहण्याचा

हर्ष आनंद मिळे जगण्याचा ||६||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics