वसुंधरा जननी
वसुंधरा जननी
उचलून संसार भार
गेली थकून पार
सोसेना वसुंधरेला आता
प्रदूषणाचा भडीमार ||१||
डोळ्यातून धरेच्या अश्रूधारा वाहे
मानव प्राण्याला नजरेस न दिसे
हिरवा शालू तिचा मलीन भासे
वेदनांचे घाव युगेयुगे सोसे ||२||
हिरवेगार वृक्ष
वसुंधरेचा खरा प्राण
वाढवू निसर्गाची शान
करु पर्यावरणाचे संवर्धन ||३||
थांबवूया आता नासधूस
साधताना आपली प्रगती
सृष्टी वसुंधरा जननीची
आपल्यामुळे न व्हावी अधोगती ||४||
वृक्ष, पाणी अन् हवा
मानवाची अनमोल दवा
खोल विचार करावा
निसर्गातून बोध व्हावा ||५||
निसर्गच आपला सखा सोबती
सृष्टी पर्यावरणाला वाचवू या
वृक्ष लागवड करुनी
भविष्य आपले घडवू या ||६||
