माहेर
माहेर
माहेराचे ध्यान
हृदयातून येते उफाळून
बालपण घेते आठवून
क्षण ठेवीते गाठवून
माहेर माझे
ईश्वरी रुपी आगर
आईबाप मायेचा सागर
भाऊ भावजयी आदर
माहेराची ओढ
किती लागते उरात
सारे नांदती सुखात
भाच्ची लाडकी घरात
माहेर माझे
नित्य फुललेले आनंदवन
खाणं, पिणं, राहणं
मजेत रमूण फिरणं
माहेरच्या अंगणी
उभी तुळस हिरवीगार
पानेफुले रंगीत बहरदार
वाहे जिव्हाळ्याचे संस्कार
