गौरव महाराष्ट्राचा
गौरव महाराष्ट्राचा
गड किल्ले, सह्याद्री रांगा
दख्खनच्या पठाराची खाण
हिरवळ सृष्टी पिके शेतीभाती
छत्रपती शिवशंभू महाराष्ट्राची शान||१||
अवघ्या महाराष्ट्राचा कळस
दिव्य त्यांचे साक्षात्कार
आमचे छत्रपती शिवराय
करू त्यांचे स्वप्न साकार ||२||
जिजाऊंच्या आम्ही लेकी
कुठे न आम्ही मागे पडती
जिजाऊ,अहिल्या,सावित्रीबाई
परंपरा हिच आमची संस्कृती ||३||
महाराष्ट्र माझा संतांचा
मायबोली संस्कारमय
ग्रंथ, गाथा, पसायदान
जीवन अवघे सुखमय ||४||
शेतकरी राष्ट्राचा पोशिंदा
डॉक्टर्स, नर्स, पोलीस, आर्मी
अग्निशामक स्वयं सेवक
कर्तव्यपार सत्कर्मी ||५||
