STORYMIRROR

Sunita Padwal

Others

2  

Sunita Padwal

Others

श्रीरामांच्या चरणात

श्रीरामांच्या चरणात

1 min
37

जीव रंगला दंगला

श्रीरामांच्या चरणात

वात नयनांत टाकूनी

वाट आतुर सहवासात ||१||


सप्तगुण संयमाचे

नम्रभाव सद्गुणी 

किती गावे गुणगान

श्रीराम ध्यानी मनी ||२|| 


नाम जप सदा मुखी 

सिता वल्लभा गुणी 

बंधूभाव सदा हृदयी 

रामलक्ष्मणा दुजे ना कोणी ||३||


चैतन्यमय लीला तनी 

हनुमंत रंगला दंगला

रामसिता हृदयांतरी वसे 

रामदूत रामकार्या गुंतला ||४||


प्रभुरामनाम घेता देवा 

मिळे नवचैतन्य संजीवनी

आदर्श संयम प्रजापती

एकपत्नी, एकनिष्ठ, एकवचनी ||५||


Rate this content
Log in