वाचन संजीवन
वाचन संजीवन
ज्ञान,संस्कार विचारांची
चाले देवाण घेवाण
पुस्तक ,ग्रंथ वाचनाने
होई वृंद्धिगत ज्ञान
नित्यदिनी पुस्तक वाचनाने
ज्ञान आत्मसाताची आवड
शब्द सामर्थ्य वाढविण्या
जरूर काढावी सवड
वाचाल तर वाचाल
जीवन होई अमृत
ज्ञान भांडाराचा साठा
दिवसेंदिवस होई वृंद्धिगत
संत तुकोबांचे अभंग
शब्द धन अनमोल देण
दिल्या घेतल्याने वाढे ज्ञान
पुस्तकमित्र सहवासी मिळे संजीवन
ग्रंथातून मिळे सर्वा
ज्ञानसंपदा शक्ती वरदान
पुस्तक वाचन शिक्षण
सुंदर आयुष्य जगण्या अभिमान
